Total Pageviews
Wednesday, May 3, 2023
सोप्या शब्दात शेतकरी कोण
सोप्या शब्दात सांगायचं झाले म्हणजे शेतकरी कोण म्हणजे अशी व्यक्ती की जी भगवंतावर विश्वास ठेवून आपल्या शेतात राब राब राबते कधी हा विचार करत नाही की पाऊस येईल किंवा नाही येईल मी टाकलेले बियाणे बेल किंवा नाही उगवेल मी केलेला धान्याला पाहिजे तितक्या प्रमाणात उत्पन्न मिळेल किंवा नाही मिळेल मी उत्पादन केलेले मार्केटमध्ये नेलेले धान्य योग्य भाव मिळेल किंवा नाही मिळेल या गोष्टीची कुठली शाश्वती नसलेली व्यक्ती म्हणजेच शेतकरी अशा या शेतकऱ्यावर संपूर्ण जग चा अवलंबून आहे असे म्हणाले तरी काही वावगे ठरणार नाही कारण जगाचा पोशिंदा म्हणजेच शेतकरी असं संबोधलं जातं यात काहीच सुख ठरणार नाही शेती पिकली तरच धनधान्य फळ फळावर औषध उपयोगी वस्तू या सर्व गोष्टी उपलब्ध होतील आणि हे सगळे काम आमचा शेतकरी करतो तेही मोबदला काय मिळेल याची अपेक्षा न बाळगता फक्त एकाच विश्वासावर की मी लावलेले धान्य वाया जाणार नाही मी केलेली फळ फळावर वाया जाणार नाही आणि ही सर्व गोष्ट फक्त आणि फक्त निसर्गावर अवलंबून असते आणि निसर्ग म्हटलं की आपणा सर्वांना माहीतच आहे अस्थिर झालेले हे वातावरण आपणास बघा आपण कधी बघतो घराचा पाऊस तर कधी बघतो सोसाट्याचा वारा अशा माझ्या शेतकऱ्याची काय नसतं ही फक्त त्याच्या जिवालाच माहिती एवढे करून सुद्धा त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळेल याची कुठेच शाश्वती नाही शासनही शंभर टक्के शेतकऱ्याचीच बाजू घेईल याची अजिबात गॅरंटी नाही हो माझ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने खूप योजना राबवल्या आणि ह्या योजनेचा लाभ देखील शेतकरी घेत आहे याबाबत शेतकरी देखील खुश आहे मात्र शेतकऱ्याला गरज आहे ती फक्त एकाच गोष्टीची की मी पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळावा व माझ्या झालेल्या नुकसानीचा मीच भरलेला पिक विमा मला वेळेत भेटावा आपण बघतोय गेल्या दोन वर्षापासून बरेच शेतकरी पिक विमा भरतात परंतु सर्वांनाच वेळेवर पिक विमा मिळतो असे नाही या सर्व गोष्टीचा विचार सर्वच नागरिकांनी अधिकाऱ्यांनी जबाबदार व्यक्तींनी करावे असे माझे छोटेसे मत आहे मी मांडलेली मते आपल्याला आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा व कमेंट जरूर करा आमचा शेतीमाती आहे यूट्यूब चैनल देखील आहेत जरूर बघा याव्यतिरिक्त आपले सरकार भादली हा देखील एक चैनल आहे नक्की बघा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कुसुम सोलर योजना आजपासून सुरू
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून कुसुम सोलर पंप योजना झालेली आहे ज्या सोलर पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळा...
-
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून कुसुम सोलर पंप योजना झालेली आहे ज्या सोलर पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळा...
-
पावसाळा लागला की जनावरांना काय टाकावे याची मोठी शेतकऱ्याला चिंता पडते परंतु यासाठी एप्रिलच्या शेवटी किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात जनावरांच्...
No comments:
Post a Comment