Total Pageviews

Saturday, May 6, 2023

मोसंबी लागवड

 मोसंबी लागवड ही शेतकऱ्यांनी खूप फायद्याची व कमी मेहनतीची अशी फळबाग आहे या फळबागेची लागवड जून जुलै महिन्यात करावी मोसंबीच्या बऱ्याचश्या वेगवेगळ्या जातींपैकी सगळ्यात महत्त्वाची असलेली  मोसंबी फळबाग लागवडीसाठी असलेली जात म्हणजेच न्यू शेलार आवाहन चांगल्या प्रतीचा उत्पन्न देणार असून काळया

जमिनीत देखील चांगल्या प्रकारे येतो त्यामुळे या वाणाची निवड करून येणाऱ्या जून जुलैमध्ये डायरेक्ट रोपवाटिकेतून आपल्याला रोपे मिळतील रोपांची जास्त वाढ झाली असल्यास अशी रोप आपल्याला 90 रुपये पर्यंत मिळतील अशीच रोपे आपण आपल्या शेतातून मोसंबी लागवड करावी मोसंबीला तिसऱ्याच वर्षी फळे सुरुवात होतात परंतु चार वर्षानंतर फळे घेतले तर अधिक लाभदायक ठरू शकते माझी स्वतःची बाग सद्यस्थिती तीन वर्षाची कम्प्लीट झाली असून यावर्षी 50 टक्के बाग आलेली आहे परंतु आम्ही बरेचसे तोडून टाकल्यामुळे यावर्षी धरली नाही शेतकऱ्यांनी मोसंबी लागवड केल्यानंतर यामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन खरीप हंगामात व उन्हाळी हंगामात कांदा सतत तीन वर्ष आपण आपल्या बागेत घेऊ शकतो त्यानंतर आपण आपली बागेची चांगल्या प्रकारे मशागत करून फक्त बाबत सांभाळी तर अधिक चांगले होईल अशा पद्धतीने आपण आपल्या शेतात डायरेक्ट मोसंबीची लागवड करू शकतात आंतरपीकाबाबतची अनुभव मी माझ्या शेतात स्वतः घेतलेला आहे विषय किती अंतरावर मोसंबीचे फळझाड लावावे आपण पंधरा फूट किंवा त्यापेक्षा कमी अंतरावर देखील घेऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती आम्ही लवकरच आमच्या शेतीमती  या चॅनल वर देऊ.

https://youtube.com/@shetimatibhadali

No comments:

Post a Comment

कुसुम सोलर योजना आजपासून सुरू

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून कुसुम सोलर पंप योजना झालेली आहे ज्या सोलर पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळा...