कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास 24 तासाच्या महा ऊर्जा किंवा महावितरण कार्यालयाची संपर्क साधून आपली तक्रार द्यावी.
सौर कृषी पंप प्रणालीचे नैसर्गिकरीत्या नुकसान झाल्यास विमा दावा तीन दिवसात संबंधितांकडून पंचनामा करून तो कम्पनी स्थळ परीक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्याला देणे आवश्यक आहे.
सौर पंप चे सामान चोरी झाल्यास विमा दवा करण्यासाठी तीन दिवसाच्या आत जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर ( FIR ) दाखल करून त्याची प्रत संबंधित पुरवठादार कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे ! विमा दावा करण्याच्या प्रक्रियेसाठी तीन दिवसाचा कालावधी असतो सर्व कागदपत्रे तीन दिवसाच्या आत देणे बंधनकारक आहेत सर्व कागदपत्र सादर करावी पात्र झाल्यानंतर विमा एजन्सी कडून पुरवठादाराना नुकसान झालेल्या बाबी बदलून देण्याचा अहवाल दिला जातो व पुरवठादार या खराब झालेल्या किंवा चोरी गेलेल्या बाबी बदलून तुमचा सौर कृषी पंप सुरू करून देण्यात येतो
तर या आहेत काही बाबी आपला सौर पंप जास्तीत जास्त दिवस चालवा यासाठी वरील गोष्टी लक्षात घ्यावा.
No comments:
Post a Comment