Total Pageviews

Friday, April 28, 2023

शेती विषयक सविस्तर माहिती

आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे या देशात जास्तीत जास्त नागरिक हे शेतीवरच अवलंबून आहे शेती पिकली तरच सर्व समाजाला व जनतेला अन्नधान्य पुरवले जाईल या सर्व गोष्टी आपण आपल्या शाळेत असतानाच भुगोलामधून शिकलो आहोत.
म्हणतात ना देश तसा वेश अशाच पद्धतीने जगामध्ये किंवा भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जमीन ही वेगवेगळ्या प्रकारची आहे काही ठिकाणी सपाटीकरण आहेत तर काही ठिकाणी स्तरीत खडक आहेत तर काही ठिकाणी डोंगर भाग आहेत तर काही ठिकाणी वाळवंट आहेत अशा अनेक प्रकारातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारात जमीन आहे व या ठिकाणी असलेला मोसम देखील हवामानाच्या हिशोबाने वेगवेगळ्या पद्धतीने आहेत ती परिस्थिती बघितली तर हवामान स्थिर झालेल्या आहेत पहिल्यासारखी परिस्थिती आता हवामानाची राहिलेली नाही आपण बघतोय प्रत्येक विभागातून कधी अतिवृष्टी होते तर कधी पाऊसच पडत नाही सुनामी सारख्या परिस्थितीतून आपण निघालो आहोत ही सर्वांना माहीतच आहे आजच्या परिस्थितीत उन्हाळा असून देखील पाणकळ्या समान पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्याला कोणते पीक कोणत्या वेळात घ्यावे व त्याचे संरक्षण कशा पद्धतीने करावे ही एक आव्हानच झाले आहे या आव्हान जरी समोर असले तरी आता भारतामध्ये भरपूर तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे वेळेवर आपल्याला सर्व माहितीचा अंदाज होतो व त्यामुळे शेतकरी सावध होत आहे जसे पंजाब डक साहेब आपल्याला वेळेत माहिती देतात व आपल्याला त्यामुळे काय काम शेतीत करायची अशा गोष्टी आपल्याला समजून जातात त्यामुळे शेतीत जास्त विकसित तंत्रज्ञान आल्यामुळे शेती करणे शेतकऱ्याला थोडेसे का होईना सोपे झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आधुनिक तंत्राचा वापर करून आपली शेती करावी मात्र हे सर्व करत असताना रासायनिक शेतीचा जास्त वापर झाल्यामुळे माणसाच्या आयुष्यमानावर व आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे याही गोष्टी जाणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी औषधाचा वापर हा योग्य तो प्रमाणात केला पाहिजे रासायनिक खते थोड्याफार प्रमाणात वापरून सेंद्रिय खताकडे आज वळण्याची गरज आहे आपल्या शेतात निघालेल्या पालापाचोळ्यापासून जास्तीत जास्त पद्धतीने गांडूळ शेती करून आपण खत निर्मिती करणे आज काळाची गरज आहे सारा पिकासाठी योग्य ते चारा पीक घेऊन जनावराचे संगोपन करून जनावर वाचवणे हे शेतकऱ्याचे सर्वात महत्त्वाचा विषय आज बैलांची शेती शिवाय पर्याय नाही कितीही आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले तरी बैल शेतीला शेतकऱ्यांनी महत्त्व देणे गरजेचे आहे व ते दिलेही पाहिजे वेगवेगळे चारा पिकं आपल्या शेतात घेऊन आपल्या नंदीबैलाचे जोपासून करणे गरजेचे आहे गरजेचे आहे आता सर्व आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत आंतरपीक घेणे देखील सर्व शेतकऱ्यांना सोयीचे झाले आह फळबागा लागवड करणे हे देखील खूप महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांसमोर असतो मी माझ्या स्वतःच्या शेतीत देखील मोसंबीची लागवड करून गेल्या चार वर्षापासून उन्हाळ्यात कांदा पिक खरीप हंगामात सोयाबीनचे पीक घेत आहेत अशाच पद्धतीची शेती आपण आपल्या शेतात करावी हीच अपेक्षा अशाच प्रकारची नवनवीन माहितीसाठी आमच्या शेतीमाती या ब्लॉगला जरूर भेट द्या व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा ब्लॉग पाठवा आमचा यूट्यूब चैनल देखील आहे शेतीमाती भरली म्हणून नक्की भेट द्या.

1 comment:

कुसुम सोलर योजना आजपासून सुरू

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून कुसुम सोलर पंप योजना झालेली आहे ज्या सोलर पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळा...